मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही कर्नाटकातील भाजपचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. या कार्यक्रमाला येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येडियुरप्पा आणि भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाला इतर 3000 पाहुण्यांसमवेत हजेरी लावतात.देश मोठ्या संकटाशी सामना करत असताना एका राज्याचा मुख्यमंत्री इतका बेजबाबदार कसा वागू शकतो?? महाराष्ट्र आज उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाला इतर ३००० पाहुण्यांसमवेत हजेरी लावतात.देश मोठ्या संकटाशी सामना करत असताना एका राज्याचा मुख्यमंत्री इतका बेजबाबदार कसा वागू शकतो?? महाराष्ट्र आज उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो.#येडाप्पा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त
राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात
घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष?, शरद पवार संतापले
करोनाबद्दलच्या ‘या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका; शरद पवारांचं जनतेला आवाहन