आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मंत्री नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ आरोप करत असून, मलिक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
भाजप नेत्यांनी राज्यपालांना एक निवेदन सादर केले. नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देत असून ही महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी बाब आहे. यावर कारवाई व्हायलाच हवी. तसेच, मलिकांना सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देण्याची इच्छा असेल तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा, असं मंगलप्रभात लोढा यांनी या निवेदनाच्या माध्यमातून म्हटलं आहे.
हे ही वाचा : समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे- किरीट सोमय्या
नवाब मलिकांच्या या भुमिकेमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यांवर वयोग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत मलिकांनी वानखेडेंवर आरोप करणे थांबवले नाही तर यासंदर्भात आम्ही राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेऊ आणि वेळ पडली तर याविरुद्ध न्यायालयातही जाऊ, असा इशाराही मंगलप्रभात लोढा यांनी दिला.
दरम्यान, मंगल प्रभात लोढांबरोबर उपाध्यक्ष आचार्य त्रिपाठी, अमरजीत मिश्रा आणि दक्षिण मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”
आदित्य ठाकरे म्हणाले काल इथं कुणी गाजर दाखवून गेलं; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…
महापालिकेत भाजपला शंभरपेक्षा अधिक जागा मिळणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा