T-20 विश्वचषकाच्या 18 वा सामना आज दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा 8 विकेट्स राखत पराभव केला.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेच गमावत 143 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एविन लूईसने सर्वाधिक 35 चेंडूत 56 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रीटोरियसने सर्वाधिक 3, तर केशव महाराजने 2, तर नाॅर्खिया व रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप
विजयासाठी 144 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं हे आव्हान 18.2 षटकात 2 विकेट राखत पार केलं. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने ३९ धावा केल्या. तर एडन मार्क्ररमने 26 चेंडूत 51 धावा, तर व्हॅन डर दुसानने 51 चेंडूत 43 धावा करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात महत्तवाचं योगदान दिलं. तर वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेनने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंच्या कोरोनामुक्तीसाठी मनसैनिकांचं औरंगाबादमध्ये गणरायाला साकडं”
शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना