Home महाराष्ट्र शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते –...

शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते – देवेंद्र फडणवीस

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दादरा नगर हवेतीतील लोकसभा पोट निवडणुकीसाठीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाची दादरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

ते मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते., असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेला मोठा धक्का; राजीनामा दिलेले ‘ते’ पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

दरम्यान, शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करत असलेलं काम पाहा. जसं तिथे त्यांचं काम सुरू आहे, वसुली सुरू आहे, ते पाहाता महाराष्ट्रातले सरकार आता सरकार नसून वसुली सरकार झालं आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्याचीच बाजू घेतील, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास- क्रांती रेडकर

 आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

 जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल