आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : तालुक्यातील वराड येथे भाजपाला खिंडार पडले असून वराड बुद्रुक येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेचे उपनेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत आज अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती सभापती जनाआप्पा कोळी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, वावडद्याचे माजी सरपंच रवी कापडणे, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, रमेश सोनवणे, शिवसेनेचे मुकेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.
हे ही वाचा : आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…
गुलाबराव पाटील यांनी भाजपामधून शिवसेनेत आलेल्यांचे स्वागत केले. शिवसेनेची वाटचाल ही समाजाभिमुख राहिली असून सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून शिवसेनेकडे सर्वांचे ओढा वाढला आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, भविष्यातदेखील आम्ही याचप्रकारे आपली सेवा करत राहू, आपण सर्व शिवसेनेची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवावीत, असं आवाहनही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल