मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत .नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे, असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.
हे ही वाचा : मुजीब रेहमान, राशिद खानच्या फिरकीसमोर स्काॅटलंडचं लोटांगण; अफगाणिस्तानचा 130 धावांनी विजय
समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखेडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकार ने संरक्षण द्यावे. समीर वानखेडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा ईशारा रामदास आठवले यांनी यावेळी दिला.
दरम्यान, प्रभाकर साईलचा समीर वानखडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडियो समोर आला आहे. प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या समीर वानखडे यांच्या विरुद्ध षडयंत्र असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत. याची चौकशी व्हावीस, अशी मागणीही यावेळी रामदास आठवलेंनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा; नितेश राणेंचा इशारा
नानाभाऊ पटोलेच आता निवडून येणार; औरंगाबादच्या ‘या’ लोकगायिकानं गाण्यातून व्यक्त केल्या भावना
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत