Home महाराष्ट्र समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. यानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच आणि किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी निशाणा साधला आहे.

प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ शेअर करून एक मोठा गौप्यस्फोट केला. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. साईल यांनी केलेल्या मागणीनुसार, मुंबई पोलिसांकडून त्याला संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करू, असे संकेत वळसे पाटील यांनी दिले.

हे ही वाचा : “Breaking News! भारत-पाक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीत बिघाड, रूग्णालयात केलं दाखल”

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली नाही. समीर वानखेडेंबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील. तर प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय; अतुल भातखळकरांची टीका

भाजप विरोधात बोलाल तर तुमच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराचं मोठं वक्तव्य

संजय राऊतांनी पाठवलेल्या पत्राला लवकरच उत्तर देणार- किरीट सोमय्या