मुंबई : रोजगाराला वंचित स्थलांतरित मजुरांवर अशा प्रकारे रासायनिक फवारणी करून कोरोना विषाणूच्या शुद्धिकरणाचे प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झाले. यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष?, असा सवाल करत हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय आहे. या भयंकर घटनेचा तीव्र निषेध, असं ट्विट करत शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, करोनाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलं आहे
रोजगाराला वंचित स्थलांतरित मजुरांवर अशा प्रकारे रासायनिक फवारणी करून कोरोना विषाणूच्या शुद्धिकरणाचे प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झाले. घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष? हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय आहे. या भयंकर घटनेचा तीव्र निषेध. pic.twitter.com/VEdP52ttZy
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
करोनाबद्दलच्या ‘या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका; शरद पवारांचं जनतेला आवाहन
अजिंक्य रहाणेनं कोरोनाग्रस्तांसाठी केली ‘इतक्या’ रुपयांची मदत
रामदास आठवलेंनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक; म्हणाले…
पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराकडून 1 कोटींची मदत