आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : ईडी ही पान-तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, केंद्रातील भाजपा सरकारच्या काळात ईडी, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. अशी टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधलाय. त्या सोलापुरातील एका सभेत बोलत होत्या.
हे ही वाचा : संजय राऊतांनी पाठवलेल्या पत्राला लवकरच उत्तर देणार- किरीट सोमय्या
ईडी ही पान-तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, केंद्रातील भाजपा सरकारच्या काळात ईडी, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात आहे.त्यामुळे भाजपाच्या विरोधात बोललात तर तुमच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते शिवाय माझ्या घरीदेखील पडू शकते, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
भाजपामुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. या भीतीपोटी सर्व जण घरात बसले आहेत. भाजपाचे लोक केवळ आग लावण्याचे काम करत आहेत. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष पक्ष एकजुटीने पुढे उभे राहिलेत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलं आहे ते लोक आज खुशाल बाहेर फिरत आहेत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
…यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं; निलेश राणेंची टीका
देवेंद्र फडणवीसांनी चार महिन्यात सरकार पडणार या स्वप्नातून बाहेर पडावं- अशोक चव्हाण
सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर टीका