मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ क्लिप ट्विरवर शेअर केली. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने चुकीचे आहे. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर, त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये ‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? अशा प्रकारचा दाट संशय येतो, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा : सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये’; भातखळकरांची संजय राऊतांवर टीका
दरम्यान, दरेकरांनी यावेळी बोलताना विविध विषयावर भाष्य केलं. 100 कोटींचा लसीकरणाचा टप्पा भारताने पूर्ण केल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, ज्याची जशी दृष्टी तशी त्याला सृष्टी दिसणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या विषयी त्यांना कावीळ झालेली असल्यामुळे त्यांना सगळेच पिवळे दिसते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेले 10 कोटींचे लसीकरण सिद्ध करावे, नंतर 100 कोटीच्या लसीकरणावर भाष्य करावे, असं दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
खासदाराला साधा अर्जही भरता येत नाही; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला
राष्ट्रवादीकडून भाजपला दिवाळीचे फटाके; भाजपात गेलेले नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार?
काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा भाजपात प्रवेश