Home देश काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा भाजपात प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भोपाळ : खंडवा लोकसभेची पोटनिवडणुकीचे मतदान काही दिवसांनी होणार आहे. त्याआधीच सचिन बिर्ला या युवा आमदाराने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. भाजपाने गुर्जर मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी बिर्ला यांना गळाला लावल्याची चर्चा चालू आहे.

हे ही वाचा : कोणीही पक्ष सोडून गेला तरी, राष्ट्रवादीचा पराभव होणे अशक्य- जयंत पाटील

आमदार सचिन बिर्ला यांची भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू होती. तसेच मागील दीड वर्षांपासून भाजपासोबत त्यांची चर्चा सुरू होती. अखेर आज सचिन बिर्ला यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. बिर्ला हे गुर्जर समाजाचे नेते आहे. यामुळे भाजपाने गुर्जर मतदारांना आकर्षित करण्यासाठी बिर्ला यांना गळाला लावल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या 22 आमदारांनी बंडखोरी केल्याने मध्यप्रदेशातील सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. त्यानंतर हे आमदार भाजपामध्ये दाखल झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर काँग्रेसला ग्रहण लागले. त्यानंतर पुढील काही महिन्यांत काँग्रेसचे आमदार भाजपाला साथ देताना दिसत आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात…

“आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचल्याच नाहीत”