Home महाराष्ट्र कोणीही पक्ष सोडून गेला तरी, राष्ट्रवादीचा पराभव होणे अशक्य- जयंत पाटील

कोणीही पक्ष सोडून गेला तरी, राष्ट्रवादीचा पराभव होणे अशक्य- जयंत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज मिरा-भाईंदर आणि ठाणे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय.

हे ही वाचा : पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात

कोणीही पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडून येण्यासाठी हवी तशी संघटनात्मक रचना आपण केली पाहिजे. यासाठी बुथ कमिट्यांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवे. बुथ कमिट्या जर मजबूत केल्या तर कोणीही आपला पराभव करू शकणार नाही हा विश्वास कार्यकर्त्यांना देत 2019 ला ज्यांच्या बुथ कमिट्या मजबूत होत्या त्यांना विजय मिळाला, थोड्याबहुत मतांच्या फरकाने जे पराभूत झाले त्यांचा पुढच्या वेळी विजय निश्चितच होईल, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, मागील 70 वर्षात जे कमवले त्या गोष्टी विकण्याचा रितसर कार्यक्रम केंद्र सरकारकडून होतोय. जनतेचे शोषण सुरु आहे याचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. यासाठी आपल्याला सैन्य लागेल ते आपण उभे करुया असा पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

महत्वाच्या घडामोडी – 

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात…

“आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचल्याच नाहीत”

 आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप