Home तंत्रज्ञान स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला

स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी Apple ने आपल्या प्ले स्टोअरमधून ToTok नावाचा सौदी अरबचा चाटिंग App हटवला आहे. या ‘APP’मुळे युजर्सच्या फोनमधील डेटा लीक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सने एका वृत्तात दिली.यानंतर Appleने तातडीने हा App हटवण्याचा निर्णय घेतला.

संयुक्त अरब अमीरात सरकार युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या Appचा वापर करत होते, असं न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

हा App Breej Holding कंपनीने तयार केला आहे, युजर्सची चाटिंग, लोकेशन, रिलेशनशिप, आवाज आणि फोटो हा App ट्रॅक करत होता, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सच्या कम्प्युटर सुरक्षा तज्ञांच्या संशोधनामध्ये समोर आली आहे.

दरम्यान, यूरोप, आशिया, अफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत या Appचे मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. तर युनायटेड स्टेटमध्ये हा App सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

महत्वाच्या घडामोडी-

-“जनतेला गृहीत धरंल की, वेगळं काय घडणार”

-‘या’ दिवशी होणार महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!

-पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर