Home महाराष्ट्र वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईत शिवसेनेला मोठे खिंडार पडलं आहे. वसईतील तब्बल 150 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

पक्षाच्या आढावा बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून वगळले जात असून इतर पक्षातून आलेल्यांना जवळ केले जात असल्याचा आरोप करत वसई पूर्वमधील गोखिवरे, सातिवली, वालिव ,गावराईपाडा ,संतोष भुवन या पाच विभागांतील सेनेच्या 150 पदाधिकाऱ्यांनी पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

हे ही वाचा : मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

सामूहिक राजीनामा दिलेल्यांमध्ये बोईसर विधानसभा समन्वयक अजित भोईर, उपतालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, विभागप्रमुख शरद गावकर, युवा सेनेचे धनंजय मोहिते यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पूर्वपट्टीत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. पदापेक्षा आमची शिवसैनिक म्हणून ओळख आहे. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसैनिक म्हणून आम्ही कायम आहोत. सत्ता आल्यावर पक्षासाठी मोठे योगदान दिलेल्या शिवसैनिकांना लांब केले जात आहे. तर इतर पक्षातून आलेल्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. अशा प्रकारे या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हांला जागे करायला आलोय”

“दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राष्ट्रीय राजकारणात येणार”

मुख्यमंत्र्यांवर कुणी दबाव टाकत असेल तर भाजप आंदोलन करेल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा टोला