आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा लाभदायी ठरला. आज सकाळी बीडमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर काही तासातच जीत पवारांच्या उपस्थितीत गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
आजच्या पक्ष प्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा : अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! रूपाली चाकणकर यांची नियुक्ती
कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला. पवार साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांसाठी सहकार्याची भावना ठेवा अशी पवार साहेबांची आम्हाला सूचना असते, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार श्री. सुनिल तटकरे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
भास्कर जाधव शेतामध्ये एखादं बुजगावणं असतं तसं…; प्रवीण दरेकरांचा टोला
गोव्यात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश