आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला. निवडीबाबतचे पत्र त्यांना मिळाले असून आज अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हे ही वाचा : “हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आक्रमक चेहरा म्हणून रूपाली चाकणकर यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला परतवून लावण्यापासून ते रस्त्यावरची आंदोलने आणि हजारोंच्या गर्दीत विषयांची मुद्देसूद मांडणी करत भव्य व्यासपीठ गाजवण्यासाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भास्कर जाधव शेतामध्ये एखादं बुजगावणं असतं तसं…; प्रवीण दरेकरांचा टोला
गोव्यात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश