आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी मोठा दावा करून भाजपच्या चिंतेत भर टाकली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे तब्बल 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
हे ही वाचा : “चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हांला शहाणपण शिकवू नये”
मी एक सांगतो की, मुंबई महापालिकेचे भाजपचे काही नगरसेवक निराश आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलण्यात येत असल्याने , यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला किंवा निवडणुकीपूर्वी मुंबई शहराला कळेल, असं यशवंत जाधव म्हणाले आहेत.
भाजपचे हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुळवून घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नाराज नगरसेवकांना शिवसेनेचा आधार वाटत आहे. त्यांच्यासमोर शिवसेना हाच एक पर्याय आहे, असंही यशवंत जाधव यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मिरजेत नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
“हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”
…त्यामुळे संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं; नितेश राणेंची टीका