आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्याला त्रास देत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘देशावर आलेले भाजपाचे संकट परतवून लावा’, असं आवाहन जनतेला केलं होतं, यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : “ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ, गडचिरोलीतील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”
‘पवार साहेब म्हणतात म्हणून केंद्र सरकारचा पराभव होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटते त्यावर केंद्रात सरकार कुणाचे असेल ते ठरेल. सर्वसामान्य माणूस सुखी आहे. साडेचार कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. त्यामुळे पवार साहेबांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत. या यंत्रणेच्या वतीने उत्तर द्यायला मी त्यांचा अधिकारी नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच होणार”
‘या’ महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी लढणार एकत्र
राज ठाकरेंना ओळखत नाही म्हणून वॉचमनला मारहाण?;अभिनेत्रीची गुंडगिरी