गडचिरोली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. याचा मोठा फायदा होत असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा : “…तर पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच होणार”
प्रत्येक गावात मनसेची शाखा असायलाच हवी असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. सध्याची राजकीय परिस्थती बघता तरूण युवावर्ग राज ठाकरे यांच्या बाजूने वळताना दिसत आहे.
रविवारी आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुंघडा गावातील तरुण- तरुणींनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, उपजिल्हाध्यक्ष रणजित बनकर आणि हरीश वलादे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. तसेच राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही मनसेत प्रवेश केला असल्याची माहिती या युवकांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
‘या’ महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी लढणार एकत्र
राज ठाकरेंना ओळखत नाही म्हणून वॉचमनला मारहाण?;अभिनेत्रीची गुंडगिरी
“ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”