आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रावेर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यानंतर विरोधकांकडून सरकार पडेल अशी टीका होत आहे. आता अशातच रावेर येथील महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रितरित्या लढण्यावर स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे.
प्रभाग रचना आणि आरक्षण झाल्यावर जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे ही वाचा : राज ठाकरेंना ओळखत नाही म्हणून वॉचमनला मारहाण?;अभिनेत्रीची गुंडगिरी
आमदार चौधरी यांनी शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. यानंतर राज्यात सत्तेत असलेले तीनही पक्ष पालिकेची निवडणूकदेखील आघाडी करून लढवावी, असं मत आमदार चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. यावर उपस्थित सर्वांनी मान्यता दिली आहे.
तीनही पक्षांचे जागावाटप आणि उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय अजून घेता येणार नाही. अंतिम प्रभाग रचना आणि जागांचे आरक्षण जाहीर झाल्यावरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना विविध कार्यकर्त्यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने रावेर पालिकेतही सत्ता मिळाल्यास विकासासाठी आधिक निधी मिळवणे शक्य होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रल्हाद महाजन, रमेश महाजन (गोठूशेठ), हरीश गनवाणी, अनिल अग्रवाल, प्रकाश मुजुमदार, सोपान पाटील, आसिफ मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन, नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी (खिरवडकर), रवींद्र पवार, डॉ. राजेंद्र पाटील, मेहमूद शेख, प्रणित महाजन उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची खेळी; एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभारणार
“शरद पवार जेंव्हा संसदेत होते, त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते”