आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला होता.
हे ही वाचा : पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा
बेईमानीने मुख्यमंत्री पद मिळवले, असा आरोप फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला. उद्धवसाहेबांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. पण मुखवटा परिधान करणे चुकीचे आहे. त्यांनी आता मुखवटा उतरावावे आणि मान्य करावे त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावरू आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगावात भाजपाने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यावेळी मी स्वतः भाजपाकडे तक्रार केली होती, शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन पहिली बेईमानी भाजपाने केली, त्यावेळेस भाजपाने बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. आधी बेईमानी कोणी केली हे भाजपाने तपासावे. आज ते जसे म्हणतायेत तसे उद्धवसाहेब बेईमान झाले नसते, असा पलटवार गुलाबराव पाटलांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा
उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”