आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्याच्या मोहिमेनंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबईकडे लक्ष वळवले आहे. 23 ऑक्टोबर रोजी भांडुपमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.
मागील निवडणुकीत मनसेला राज्यात चांगलं यश प्राप्त करता आलेलं नाही. मात्र, आगामी निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश किसन वीर यांचं दीर्घ आजारानं निधन”
दरम्यान राज ठाकरे स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. 23 ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलीय.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”
फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक