आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावरून आथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही- पंकजा मुंडे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलंय की, केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं. आम्ही म्हणतो की, पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल, असा पलटवार नवाब मलिकांनी यावेळी केला.
दरम्यान, भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोपही फडणवीसांनी केला होता. यावरही नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही- पंकजा मुंडे
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”
उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश