Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”

“मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना तुफान भाष्य केलं होतं.

विचार एकच असल्यामुळे आम्ही युती केली होती. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर तुम्ही परत मुख्यमंत्री झाले असता. मी केवळ शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. कारण शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं वचन दिलं होतं आणि ते मी पूर्ण करणारच, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय… दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय… साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना…… , असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या वादाला सुरूवात; ‘या’ कारणामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने

तुमच्या पक्षात किती कट्टर शिवसैनिक आहेत ते सांगा?, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल