Home पुणे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्य होता, असं शरद पवार यांनी म्हटलं.

हे ही वाचा : नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

सध्या केंद्रातील भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांना कामाला लावले जात आहे. मात्र उद्धव ठाकरे दबावाला बळी पडणारे नेते नाही. अशा कितीही चौकश्या झाल्या तरी ते डगमगणार नाहीत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्य होता, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा आढावा जाणून घेण्यासाठी शरद पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या वादाला सुरूवात; ‘या’ कारणामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने

तुमच्या पक्षात किती कट्टर शिवसैनिक आहेत ते सांगा?, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे