आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर भाजपच्या लोकांनी यावरून प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
भाजप सत्तापिपासू आहे, अशी टीका करणं नेमक्या कोणत्या शिवसेनेच्या संस्कृतीत बसतं?, असा सवाल दरेकरांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा : बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे
पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान आवताडे व देगलूरच्या पोटनिवडणुकीतील भाजपने तिकीट दिलेले सुभाष साबणे हे बाहेरून आलेले नेते आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले . पण असं म्हणत असाल तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत? शिवसेना स्थापनेच्या वेळी असलेले निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत का?, असा उलट सवाल दरेकरांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, माळेगावच्या संचालकानं हाती बांधलं घड्याळ
“हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”
“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”