आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पूर पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, असा आरोप करत मनसेने महाविकास आघाडी सरकार निषेधात आज पुणे येथे आंदोलन केले. यावेळी रावणरुपी आघाडी सरकरच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केवळ 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. पंचनामे, पाहणी ही औपचारिकता न करता थेट हेक्टरी 50 हजाराची सरसकट मदत करा, अशी मागणी यावेळी मनसेने केली
हे ही वाचा : चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरत चेन्नईने लुटलं विजयाचं सोनं
दरम्यान, ई-पीक पाहणीतून शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेतली जात आहे. ही अत्याधुनिक पध्दत चांगली आहे. मात्र, याकरिता सरकारी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नाहीत. अॅपमध्ये भरावयाची माहिती किचकट असून शेतकऱ्यांना याचे ज्ञान नाही. त्यामुळे ही माहिती भरणे अनिवार्यच असेल तर अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहतील म्हणून ई-पीक पाहणी रद्द करा किंवा यासाठी शासकीय यंत्रणा राबवा, असं मनसेने म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत अजून जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं त्याला ठेचू”
“कोणी कितीही दावा करा, मात्र पुणे-पिंपरीत महापाैर राष्ट्रवादीचाच होणार”
“प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरेंना बोलवा, महाराष्ट्राला चांगला संदेश जाईल”