Home महाराष्ट्र “आजच्या दिवशी तरी शुभ बोललं पाहिजे, अजून तरी या देशानं लाज सोडलेली...

“आजच्या दिवशी तरी शुभ बोललं पाहिजे, अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी केलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का?- महादेव जानकर

आज विजयादशमी आहे. अशा दिवशी शुभ बोललं पाहिजे., असा सल्ला संजय राऊतांनी संभाजी भिडेंना यावेळी दिला. अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही. 2024 मध्ये ते स्पष्ट दिसेल, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, भारत हा स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. जगाच्या पाठीवर 187 देश आहेत. त्यात 1 अब्ज 23 कोटी लोकांचा एक देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, परक्यांचा दास्यत्व पत्करत, परक्यांचं खरकटं उष्टं खात राहिलेला निर्लज्ज लोकांचा हा देश आहे, तो म्हणजे भारत, असं विधान संभाजी भिडेंनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“शस्त्र कधी, कुणासाठी काढायची असतात, हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून कळेल”

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

 जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है, म्हणू नये; गुलाबराव पाटलांचा मनसेवर पलटवार