आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या मागेपुढे कोणी असो वा नसो, भाऊ म्हणून मी पाठीशी कायम उभा राहणार आहे, असं वक्तव्य रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.
हे देखील वाचा : महापालिकेवर सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शरद पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
“पंकजा मुंडे या भगवान गडावरील मेळाव्याच्या क्रियेटर आहेत. पंकजा मुंडे यांच्या मागे कुणी असो अथवा नसो, मी भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे. पंकजा मुंडे यांनी बोलावलं नाही तर मी मेळाव्याला येणार श्रोत्यांमध्ये बसेल पण दसरा मेळाव्याला मी जाणार आहे,” असं महादेव जानकर म्हणाले.
पंकजा मुंडे राज्यातील नेतृत्व तसेच इतर कारणांमुळे नाराज असल्याचं नेहमी बोललं जातं. यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. “बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते. पण पंकजा ताईंनी मला असं काही बोलून दाखवलं नाही. त्यामुळे नाराज आहेत असं मला वाटत नाही,” असंही महादेव जानकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आजच्या दिवशी तरी शुभ बोललं पाहिजे, अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही”
पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का?- महादेव जानकर
“शस्त्र कधी, कुणासाठी काढायची असतात, हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून कळेल”