आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बीडमध्ये उद्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत याच पार्श्वभूमीवर उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जाती किंवा वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
हे ही वाचा – …तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपमध्ये असते; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट
दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. प्रत्येक कार्यक्रमांमागे काही तरी एक नवा संकल्प असतो. तसाच या दसरा मेळाव्यामागे आहे. डोंगरकपारीत कष्ट करणाऱ्यांचा हा मेळावा आहे. बहुजन आणि वंचितांचा हा मेळावा आहे. परंतु यावेळचे दसरा मेळाव्याचे स्वरूप किती सुंदर आणि देखणे आहे, हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे, असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत.
मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल. बीडमध्ये दसऱ्याला भगवान गडावर भक्तीचा मेळा जमतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा आहे. मेळाव्याला येणारा फक्त कार्यकर्ताच असेल असे नाही. तो ऊर्जा घेण्यासाठी येतो. भगवान गडावर खरी भक्ती असणारा नेता आणि सामान्य माणूस मोठ्या उत्साहाने येतो. जनतेने मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा, हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे, असंही वक्तव्य पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ
“महाराजांच्या घोड्यावर बसणं गाढवपणा, आता या कृत्यानंतर बाबरसेना काय करणार?”
तुम्ही कोणते टगे पोसत आहात हे पहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल