Home महाराष्ट्र देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा

देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : पंढरपूरच्या विधानभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने बाजी मारली होती. आता  देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला आम्ही दुसरा धक्का देणारच, असा दावा भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केला आहे. औरंगाबादेत झालेल्या ओबीसी जागर अभियान मेळाव्यात ते बोलत होते.

हे ही वाचा- ओबीसी आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला हे सगळ्यांनाच ठाऊक- धनंजय मुंडे

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हेच सुरू आहे. केंद्र सरकारमुळे हे आरक्षण गेले, देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, असं धादांत खोटं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. केंद्राचा याच्याशी काहीही संबंध नाही; शिवाय ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातले रद्द झाले आहे, देशातील इतर कुठल्याही राज्यात ते रद्द झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आपलं पाप झाकण्यासाठी या सरकारचा हा सगळा खेळ सुरू आहे. मराठा, ओबीसी समाजाच्या हे आता लक्षात आले आहे, असं संजय कुटे म्हणाले आहेत.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या दोन्ही समाजांनी आपली नाराजी मतांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. आता देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातदेखील भाजप महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरच्या विजयाची आम्ही देगलूरमध्येही पुनरावृत्ती करू, असंही संजय कुटे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरे

जरा लाज वाटू द्या; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’ नेत्याचं विधान