मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युतीची चर्चा रंगली आहे. आणि अशातच राज ठाकरे यांचे मुख्य शिलेदार म्हणून ओळख असलेल्या बाळा नांदगावकर यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलय.
दोन पक्षांचे नेते एकमेकांना भेटले की, राजकीय चर्चा होतेच. तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावा. मी माझ्या वैयक्तिक कामासाठीच आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनीच फोन केला होता. त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार हेदेखील आधीपासूनच उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचा महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात…
भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; मराठवाड्यातील ‘या’ माजी मंत्र्यांचे बंधू भाजपच्या वाटेवर
“जनतेनं मला कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही, मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं”