आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
परभणी : परभणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. परभणीचे काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत परभणीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“जनतेनं मला कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही, मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं”
“विराट कोहलीनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडू आयपीएलचं कर्णधारपद सोडणार?”
“पालघरमध्ये शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात, अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश”
“भाजप आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ, आमदारकी धोक्यात?”