आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला भाजपा व मनसेने विरोध केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मनसेवर निशाणा साधलाय.
“लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपाचा पाठिंबा आहेच; पण मनसेचे शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन असल्याचं दिसत आहे. म्हणजे महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला विरोध करून मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का? असा खोचक सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्यावतीने आज मुंबईतील हुतात्मा चौकात शेतकर्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक मीडियाशी बोलत होते.
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक पुकारली आहे. या बंदच्या समर्थनार्थ आज हुतात्मा चौक, मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.(१/४)#LakhimpurKheriViolence#महाराष्ट्र_बंद pic.twitter.com/eDiNasf20M
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”
“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”
आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसला; चंद्रकांत पाटलांचा दावा
“मनसेमध्ये जोरदार इनकमिंग, विदर्भात विविध पक्षातील 200 कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”