आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या बंदला महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी याला विरोध केला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
आजचा महाराष्ट्र बंद हा पूर्णपणे फसलेला आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. तसेच लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक का दिली, हे अनाकलनीय असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही. त्यांना या प्रकरणाची केवळ अर्धी बाजू माहित आहे. लखीमपूर घटनेत जीप घुसली, त्यामध्ये चार जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिअॅक्शन म्हणून चार जणांना ठेचून मारलं, त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, मी त्या खोलात जात नाही, कारण तो माझा विषय नाही. या सगळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलाला अटक झाली, आता त्याची चौकशी होईल, मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेमध्ये जोरदार इनकमिंग, विदर्भात विविध पक्षातील 200 कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”
“नैतिकता शिल्लक असेल तर, महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा”
महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज ठाकरेंच्या मनसेचाही विरोध
भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश