आता त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; अमोल कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

0
187

पंढरपूर : कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भारत नानांवर या मतदारसंघातील जनतेनं अलोट प्रेम केलंय. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वास अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडेल हे अजित पवारांना माहिती- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस – अजित पवार

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहेत- अतुल भातखळकर

ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; किरीट सोमय्यांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here