Home महाराष्ट्र शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले

शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : शिवसेना प्रमुखांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती. म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांचा रोख तुमच्याकडे होता, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? असं विचारताच केंद्रीय सुक्ष्म, लघु, माध्यम उद्योग मंत्री नारायण राणे  भडकले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांना सवाल करण्यात आला होता. त्यावर शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

माझी हकालपट्टी केली? ये उगाच काय ते मला चिडवू नको. माझं नाव नाही घेतलं त्यांनी. काय बोलतो?, असं राणे संतापून म्हणाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर…; रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

अजितदादांच्या नातलगांच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा आरोप

“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”