आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नुकत्याच महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या. या निवडणुकीत शिवसेनेला कमी जागेवर समाधान मानावे लागले तर भाजपाने जास्तीत जास्त जागा मिळवत चांगली कामगिरी केली. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेला सल्ला दिला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. शिवसेना पुन्हा भाजपबरोबर येऊ शकते. शिवसेनेला आपलं नुकसान करायचं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करायचं असेल तर शिवसेनेने पुन्हा एकदा विचार करावा, असा सल्ला आठवले यांनी शिवसेनेला दिला.
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेने विचार करावा, असंही आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज; गोपीचंद पडळकरांचा घणाघात
“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”