Home महाराष्ट्र एनसीबीच्या ड्रग्ज कांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

एनसीबीच्या ड्रग्ज कांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनसीबीच्या कारवाईवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. नवाब मलिक यांनी भाजप मुंबई शाखेचे माजी सरचिटणीस मोहीत कंबोज यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला होता. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं. काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असा गाैफ्यस्फोट फडणवीसांनी यावेळी केला. मात्र हा गाैफ्यस्फोट करताना त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही.

एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं. यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे., असं फडणवीस म्हणाले.

खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

अजितदादांच्या नातलगांच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा आरोप

“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”

“महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”