Home महाराष्ट्र अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केलीय. त्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचाही समावेश आहे. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहनं त्यांच्या अंगावर जातात. त्यात काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. हाजिकच या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळ बैठकीत निषेध व्यक्त केलाय. मीही याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केलीय. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आलाय. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज हे सुरु असल्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”

“राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, पिंपरीचा महापाैर तेच ठरवतील”

“लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज”

माझ्या कंपन्या जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?; अजित पवार संतापले