Home महाराष्ट्र “लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची...

“लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

लखिमपूरप्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्‍यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल., असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्‍यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते. एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे दुखणे सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही., असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्या कंपन्या जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?; अजित पवार संतापले

“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील

“मनसेची मोठी खेळी; राष्ट्रवादीत गेलेल्या ‘या’ नेत्याचा पुन्हा मनसेत प्रवेश”