Home पुणे लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर धाड टाकली असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.

लखीमपूर येथील हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करणं हाच या धाडीमागचा हेतू आहे, असा दावा जयंत पाटलांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

लखीमपूरला जी घटना घडली, त्यावर आम्ही तिन्ही पक्षांनी खेद व्यक्त केला. सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. जालियनवालाबाग हत्याकांडासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळेच दुसरीकडे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. लखीमपूरच्या घटनेला भाजप जबाबदार आहे. जालियनवाला बागे सारख हे हत्याकांड केलं आहे. असं धाडसत्रं करून लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेची मोठी खेळी; राष्ट्रवादीत गेलेल्या ‘या’ नेत्याचा पुन्हा मनसेत प्रवेश”

निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे; अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही”

भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण मनसेची साथ हवीच?