आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात भाजपने आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. तर शिवसेनेची पिछेहाट झाल्याची पाहायला मिळालं. या निकालानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आज काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे. जो पक्ष दुर्लक्षिला गेला होता त्यांना महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्यानं त्यांना नवसंजिवनी मिळाली, असेच म्हणावं लागेल. महाविकास आघाडीत शिवसेनेची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
भाजप मजबूत आहे. त्यांना तिघांना मिळून टक्कर द्यावी लागत आहे. एकाने टक्कर द्यायचं ठरवलं तर त्यांची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा, असा टोला दरेकरांनी लगावलाय. भाजपला सहा जिल्ह्यात जी मतदानाची टक्केवारी मिळाली आहे, त्याच्या आसपासही कुणी नाही, असंही प्रविण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला
काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर- नाना पटोले
“…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”