आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला
काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर- नाना पटोले
“…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”
उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला; नवनीत राणांचा हल्लाबोल