Home महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. या निकालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील  यांनी  शिवसेनेवर निशाणा साधलाय.

एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जिप निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू, असंही चंद्रकातं पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर- नाना पटोले

“…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला; नवनीत राणांचा हल्लाबोल

“BREAKING! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रूग्णालयात दाखल”