आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत विजय मिळवला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना धक्का दिला.
अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 आणि इतर 9 (यात प्रहार 1) जागा मिळाल्या. यावरून अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
जर यापुढे महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर येत्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखणं कठीण होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. तसेच महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे, असंही मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला धक्का, भाजपच्या धरती देवरे विजयी”
“पालघर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विनया पाटील यांचा दणदणीत विजय”
“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”
“अखेर मुंबईला विजयी सूर गवसला, ईशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानवर दणदणीत विजय”