12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव, त्यांच्याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतील- शरद पवार

0
363

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीतून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. ते पुण्यात बोलत होते.

ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही., असं शरद पवार म्हणाले.

एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं त्यावर मला भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here