Home महाराष्ट्र अजित दादा, बच्चू कडूंना समज द्या; अमोल मिटकरी यांची मागणी

अजित दादा, बच्चू कडूंना समज द्या; अमोल मिटकरी यांची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने भाजपसोबत युती केल्याने राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे याबाबत तक्रार दिली.

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत पालकमंत्री बच्चू कडू आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यांना समज द्या., अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

राज्यात आपण एकत्र आहोत. पण अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष भाजपसोबत जात असेल, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडूंना समज द्यावी., असं मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! अशोक चव्हाण म्हणतात…

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

“काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज”

नारायण राणेंनी वेंगुर्ला पालिकेत फडकवला भाजपचा झेंडा; महाविकास आघाडीला चारली धूळ!