खोपोली : आगामी काळात शिवसेना बॅक टू पॅव्हलियन होऊ शकते. आमची तशी अपेक्षा आहे, असं विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं.
रामदास आठवले काल खोपोलीत होते. खोपोली नगरपालिकेने बसवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आठवलेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आठवलेंच्या या विधानामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आमची तशी अपेक्षा आहे. राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकते, असंही रामदास आठवले म्हणाले. राजकारणात काहीही होऊ शकते. मी नरेंद्र मोदींसोबत गेलो नसतो तर केंद्रीय मंत्री झालो नसतो. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. आज महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली तर भविष्यात भाजपा, शिवसेना आणि रिपाइंही एकत्र येऊ शकते, असं आठवले यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ‘या’ पक्षासोबत युती?”
निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत