आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकीत साबणे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला गेला. यावरून शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
कोणीही गेले तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. सुभाष साबणे यांचे समर्थक असलेले शिवसैनिक साबणे यांना निवडून देतील अशी शक्यताही नाकारता येत नाही. मात्र काल रात्री देगलूर-बिलोली मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“ऑफीसच्या एसीत बसून मोठे लिडर झाले, यांना शेतकऱ्यांचं काय दु:ख कळणार”
“कोणी कितीही निर्धार करा, जिल्हा बँक राष्ट्रवादीकडेच येणार”
“…तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही”
“देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं; 3 जण जखमी”